maharashtra

सोशल डिस्टन्सप्रकरणी सातारा पालिका आक्रमक

आठ दुकानांवर दंडात्मक कारवाईचा बडगा

Satara Municipality is aggressive in social distance case
सातारा पालिका व शाहूपुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी शहरातील आठ दुकानदारांवर फिजिकल डिस्टन्सचे पालन न केल्याप्रकरणी कारवाई केली. संबंधितांकडून प्रत्येकी पाचशे असा एकूण चार हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

सातारा : सातारा पालिका व शाहूपुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी शहरातील आठ दुकानदारांवर फिजिकल डिस्टन्सचे पालन न केल्याप्रकरणी कारवाई केली. संबंधितांकडून प्रत्येकी पाचशे असा एकूण चार हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुकानदार व व्यावसायिकांनी फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच दुकानात प्रवेश द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निर्गमीत केले आहेत. मात्र, बहुतांश दुकानदार व व्यावसायिकांकडून या नियमांचे पालन केले जात नसल्याने प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे पालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने गुरुवारपासून कारवाई मोहीम हाती घेतली आहे.
या पथकाने मास्कचा वापर न करणाऱ्या व फिजिकल डिस्टन्सचे पालन न केल्याप्रकरणी आठ दुकानदारांवर प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची कारवाई केली.
या कारवाईत अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अजित जगदाळे, कोरोना विभाग प्रमुख प्रणव पवार, अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांनी सहभाग घेतला.