maharashtra

मोटरसायकलच्या समोरासमोरील धडकेत एक ठार, दोन जखमी


मोटरसायकलच्या समोरासमोरील धडकेत एक ठार, दोन जखमी झाल्याची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : मोटरसायकलच्या समोरासमोरील धडकेत एक ठार, दोन जखमी झाल्याची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान बिजवडी, ता. माण गावच्या हद्दीत फलटण ते दहिवडी जाणाऱ्या रस्त्यावर रामचंद्र तात्याबा दडस रा. पांगरी, ता. माण हे त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एमएच 11 सीटी 6490 घेऊन फलटण बाजूकडून दहिवडी कडे जात असताना रॉंग साईडला जाऊन समोरून येणाऱ्या अजय विठ्ठल शिंदे राहणार मुरूम तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्या मोटरसायकल क्रमांक एमएच 42 एइ 7614 हिस जोराची धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून अजय विठ्ठल शिंदे आणि दिपाली सोमनाथ शिंदे हे दोघेजण जखमी झाले आहे. या अपघाताची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस हवालदार डी डी डोईफोडे करीत आहेत.