maharashtra

घरकाम करण्यास सांगितले म्हणून मुलीची आत्महत्या


आईने घरकाम करण्यास सांगितले म्हणून मुलीने आत्महत्या केल्याची खबर सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : आईने घरकाम करण्यास सांगितले म्हणून मुलीने आत्महत्या केल्याची खबर सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या पूर्वी हिरापूर कोंडवे तालुका सातारा येथील उत्कर्षा किरण पवार वय 19 हिने आईने घरकाम करण्यास सांगितले, याचा राग मनात धरून विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची खबर किरण आत्माराम पवार वय 42 यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस नाईक पाटोळे अधिक तपास करीत आहेत.