दोन अज्ञातांनी पाण्याच्या मोटरची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : दोन अज्ञातांनी पाण्याच्या मोटरची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंपळवाडी पो.धावडशी ता.सातारा येथून दोन चोरट्यांनी 5 हजार रुपये किंमतीची पाण्याची मोटर चोरुन नेली. ही घटना दि. 5 नोव्हेबर रोजी पिंपळवाडी येथे घडली असून याप्रकरणी विजय सुभाष मेणकर (वय 43, रा. पिंपळवाडी) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


