maharashtra

वैद्यकीय व्यावसायिकाची सुमारे सव्वा लाखांची फसवणूक


वैद्यकीय व्यावसायिकाची सुमारे सव्वा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : वैद्यकीय व्यावसायिकाची सुमारे सव्वा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 7 फेब्रुवारी 2021 ते 16 डिसेंबर 2022 दरम्यान डॉक्टर राहुल सुभाष मोरे राहणार हनुमंतवाडी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली यांनी गिरीजा न्यूरो सर्जरी हॉस्पिटल मल्हार पेठ सातारा येथे येऊन डॉक्टर सुनील रामराव यादव वय 65 राहणार मल्हार पेठ, सातारा यांना मी व्यावसायिक कन्सल्टंट असून हॉस्पिटल संबंधित विमा कंपनीशी माझे संबंध आहेत, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर यादव यांनी मोरे यांच्या फोन पे अकाउंट वर वेळोवेळी पैसे पाठवले. मात्र त्यानंतर मोरे यांनी तुमच्या हॉस्पिटल नियमात बसत नाही, तुम्ही दिलेली रक्कम वर दिलेली आहे. ते पैसे मिळाले की तुम्हाला परत देतो अशी उडवाउडवीची उत्तरे द्यायला लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टर सुनील यादव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याकडे धाव घेत फिर्याद नोंदवली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे करीत आहेत.