maharashtra

जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण


Kidnapping of two minor girls in the district
सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणावून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची तक्रार विविध पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दोन्ही घटनांमध्ये अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी एक तक्रार भुईंज, तर दुसरी तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणावून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची तक्रार विविध पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दोन्ही घटनांमध्ये अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी एक तक्रार भुईंज, तर दुसरी तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
वाई तालुक्यातील एका गावातून पंधरा वर्षीय मुलीस पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. ९ रोजी घडली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, संबंधित मुलगी पाचवड येथे कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी जावून येत असे. म्हणून घरातून बाहेर पडलेली आहे ती परत आलेली नाही. याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार एस. एम. तोडरमल करत आहेत.
दरम्यान, सातारा येथील एका उपनगरातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या राहत्या घरातून कोणीतरी अज्ञाताने पळवून नेले असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना दि. ९ रोजी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञतावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कोरके करत आहेत.