जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकी चोरीस गेल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सातारा : जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकी चोरीस गेल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील गोडोली येथून विनायक मनोहर विभुते यांची दुचाकी क्रमांक एमएच 11 बीक्यू 6036 त्यांच्या राहत्या घरासमोरून दिनांक दहा डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस हवालदार पोळ अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत शनिवार पेठ कराड येथून अनिल भीमराव खांडेकर यांच्या वडिलांचे नावे असलेली दुचाकी क्रमांक एमएच 50 एच 6204 अज्ञात चोरट्याने दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोरून चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक एस. एस. पाटील करीत आहेत.


