गोडोली येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : गोडोली येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 1 ते 2 जानेवारी दरम्यान नाना बडजू घाडगे रा. गोडोली, सातारा यांची 20 हजार रुपये किमतीची, सीओ डीलक्स कंपनीची दुचाकी क्रमांक एमएच 11 एएम 1564 अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरून नेली आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस नाईक सुतार करीत आहेत.


