maharashtra

मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एस.टी. चालकावर गुन्हा


येथील एस.टी. स्टँडमध्ये आत प्रवेश करणाऱ्या एस.टी. ने पायी चालत जात असणाऱ्या एकास धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक नितीन तुकाराम निकम, वय ३०, रा. वशी, ता. वाळवा याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : येथील एस.टी. स्टँडमध्ये आत प्रवेश करणाऱ्या एस.टी. ने पायी चालत जात असणाऱ्या एकास धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक नितीन तुकाराम निकम, वय ३०, रा. वशी, ता. वाळवा याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १६ जानेवारी रोजी १०.२५ वाजण्याच्या सुमारास रवींद्र उर्फ पिंटू सुरेश बल्लाळ, वय ३४, रा. कुसवडे, ता. सातारा हे एस. टी. स्टँडमध्ये प्रवेश करणाऱ्या गेटमधून पायी चालत जात असताना एस.टी. क्रमांक एम.एच.१४ डीटी ३३०१ वरील चालक नितीन निकम याने भरधाव वेगाने एस.टी. चालवून त्यांना जोराची धडक दिली. त्यामध्ये ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार हणमंत भिकू बल्लाळ यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.