maharashtra

निवृत्त सैनिकासह त्याच्या मुलीला मारहाण; एकावर गुन्हा


निवृत्त सैनिकासह त्याच्या मुलीला मारहाण केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : निवृत्त सैनिकासह त्याच्या मुलीला मारहाण केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 मार्च रोजी दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास निवृत्त सैनिक नारायण चंदू लादे वय 80, रा. कल्पतरू अपार्टमेंट, विसावा पार्क, पीरवाडी रोड, सातारा यांना तुलसी विहार अपार्टमेंट चे वॉचमन जगदाळे रा. कोंडवे, तालुका सातारा (पूर्ण नाव माहित नाही) यांनी विनाकारण हाताने व प्लॅस्टिकच्या पाईपने मारहाण करून जखमी केले. दरम्यान ही भांडणे सोडवण्यासाठी लादे यांची मुलगी गेली असता जगदाळे याने मुलीलाही मारहाण करून शिवीगाळ केली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक के. एच. भोसले करीत आहेत.