मोरणा विभागातील पांढरेपाणी येथील एका वृद्धावर रानगव्याने जीवघेणा हल्ला केल्याने वृद्ध गंभीर जखमी झाला आहे.
सातारा : मोरणा विभागातील पांढरेपाणी येथील एका वृद्धावर रानगव्याने जीवघेणा हल्ला केल्याने वृद्ध गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मोरणा विभागातील अतीदुर्गम असलेल्या पांढरेपाणी येथील कानु धाकडू शेळके (वय 60) हे गुरे चरावयास गेले असता झुडुपातून आलेल्या रानगव्याने जोराची धडक दिली. गव्याची शिंगे शेळके यांच्या छातीत घुसल्याने शेळके हे गंभीर जखमी झाले. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पांढरेपाणी हे गाव अतीदुर्गम असल्याने तेथे रस्ता नाही. त्यामुळे जखमी शेळके यांना दवाखान्यात आणण्यासाठी ग्रामस्थांना डोलीचा सहारा घ्यावा लागला. ग्रामस्थांनी पांढरेपाणी ते मोरगिरी हे अंतर चालत पार केले. यानंतर 108 रुग्णवाहिकेतून शेळके यांना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


