maharashtra

पोक्सो गुन्ह्यातील आरोपीस अटक; वडूज पोलिसांची कारवाई


गुन्हा दाखल झाल्यानंतर पोक्सो मधील आरोपीस काही तासातच जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सातारा : गुन्हा दाखल झाल्यानंतर पोक्सो मधील आरोपीस काही तासातच जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पडळ, ता. खटाव येथे सुमारे आठ महिन्यांपूर्वी एका बांधकाम साइटवर एकाने पीडित अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला होता यानंतर पीडिता गरोदर राहिल्यानंतर वडूज पोलीस ठाण्यात दिनांक 26 ऑक्टोबर रोजी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
या कुणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, वडूज चे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबतच्या सूचना वडूजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना दिल्या होत्या. या आरोपी बाबत गोपनीय माहिती घेऊन त्यास कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, वडूज चे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख, पोलीस उपनिरीक्षक शितल पालेकर, प्रमोद दीक्षित, पोलीस हवालदार खाडे, पोलीस नाईक देवकर, पोलीस कॉन्स्टेबल लोखंडे चव्हाण, बदडे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित करीत आहेत.