तासगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत सातारा ते रहिमतपूर रस्त्यावर पायी चालत निघालेल्या दुचाकीने (एमएच ११ एटी १८८३) धडक दिली. त्यात पादचारी जखमी झाला.
सातारा : तासगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत सातारा ते रहिमतपूर रस्त्यावर पायी चालत निघालेल्या दुचाकीने (एमएच ११ एटी १८८३) धडक दिली. त्यात पादचारी जखमी झाला.
ही घटना दि. ५ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता घडली असून, याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. रिक्षाचालक विनोद पिराजी कांबळे (वय ४८, रा. मुळीकवाडी, तासगाव, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, सुनील उत्तम काटे (रा. धोंडेवाडी, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक चव्हाण तपास करत आहेत.


