maharashtra

हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकास नोटीस


हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकास सातारा शहर पोलीस ठाण्याकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

सातारा : हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकास सातारा शहर पोलीस ठाण्याकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विपुल तानाजी नलवडे वय 23, राहणार करंजे सातारा याला दोन वर्षाकरिता सातारा जिल्हा हद्दीतून हद्दपार केले होते. मात्र या आदेशाचा भंग करून नलवडे हा सातारा जिल्ह्यात येण्याबाबत कोणतीही पूर्वपरवानगी न घेता प्रिया व्हरायटी शॉप ते एसटी स्टँड कडे जाणाऱ्या रस्त्यावर वावरत असताना आढळून आला. याप्रकरणी नलावडे याला नोटीस बजावण्यात आली आहे.