कराड नगरपालिकेचा ई-कचरा विघटनासाठी पुढाकार
ई-रिसायकल कंपनीसोबत ५ वर्षाचा करार : नागरिकांना घंटागाडीत ई-कचरा जमा करण्याचे आवाहन
येथील नगरपालिकेचा ई-कचरा विघटनासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पालिकेने शहरातील संपूर्ण ई-कचऱ्याचे विघटन करण्यासाठी महालक्ष्मी ई-रिसायकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत 5 वर्षाचा करारही केला आहे. नुकताच कराड नगरपालिका आणि महालक्ष्मी ई-रिसायकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये हा करार करण्यात आला.
कराड : येथील नगरपालिकेचा ई-कचरा विघटनासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पालिकेने शहरातील संपूर्ण ई-कचऱ्याचे विघटन करण्यासाठी महालक्ष्मी ई-रिसायकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत 5 वर्षाचा करारही केला आहे. नुकताच कराड नगरपालिका आणि महालक्ष्मी ई-रिसायकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये हा करार करण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके, महालक्ष्मी ई-रिसायकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजर मनीष कुलकर्णी, पालिकेचे आरोग्य अभियंता आर.डी. भालदार, कराड शहर समन्वयक अशिष रोकडे आदी. उपस्थित होते.
सध्या इलेक्ट्रॉनिकचे युग असून या संधानानी क्रांतीही केल्याचे दिसून येते. परंतु, त्याच्या फायद्यासह अनेक तोटेही आहेत. त्यामध्ये निकामी इलेक्ट्रॉनिक साहित्यापासून निर्माण होणारा कोट्यावधी टनाच्या ई-कचऱ्याची निर्मिती होत आहे. कधीही विघटन न होणारा ई-कचरा घातक घटक असून तो पर्यावरणासाठी विषसमानच आहे. त्यामुळे ई-कचरा ही एक नवीन प्रदूषणाची समस्याच बनली आहे. परिणामी, त्याचे विघटन करण्याची
समस्या सध्या सगळ्या देशांसह शहरांना भेडसावत आहे. त्यावर उपाय म्हणून कराड नगरपालिकेने संपूर्ण कराड शहरातील ई- कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महालक्ष्मी ई-रिसायकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत 5 वर्षाचा करारही केला आहे. या कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाची मान्यता प्राप्त आहे.
नगरपालिकेच्या या प्रयत्नामुळे कराड शहरातील घातक ई-कचऱ्याचे योग्य प्रकारे निर्मूलन होऊन पर्यावरणाचा ऱ्हास थांबणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपला ई-कचरा नगरपालिकेच्या घंटागाडीत जमा करावा, असे आवाहनही नगरपालिकेच्या वतीने आरोग्य अभियंता आर.डी. भालदार यांनी केले आहे.


