एका खाजगी फायनान्स कंपनीत सुमारे चार लाखांच्या अफरातफर प्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एका खाजगी फायनान्स कंपनीत सुमारे चार लाखांच्या अफरातफर प्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 ऑगस्ट 2022 ते 30 मे 2023 दरम्यान भारत फायनान्स इंक्लुजन लिमिटेड शाखा केअर ऑफ विजय शिंदे शाहूनगर गृहनिर्माण संस्था मर्यादित कृष्णा नगर सातारा यांनी वाटप केलेल्या कर्जापैकी 18 कर्जदारक महिला सदस्यांकडून राहुल प्रदीप शिंदे रा. जायगाव, ता. खटाव, जि. सातारा याने 3 लाख 89 हजार 492 रुपये घेऊन ही रक्कम स्वतःसाठी वापरून कंपनीची व महिला कर्जदारांची फसवणूक केली आहे, अशा तक्रार अर्जावरून शिंदे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले करीत आहेत.


