सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी दोघांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी दोघांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सविता रमेश सूर्यवंशी रा. हमीद वाडा, ता. कागल, जि. कोल्हापूर या त्यांच्या माहेरी रक्षाबंधनासाठी आल्या असता त्यांच्या प्रवासी बॅगेतील सुमारे 2 लाख 20 हजार रुपये किंमतीचे साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने संजय रामचंद्र पवार आणि अश्विनी संजय पवार दोघेही रा. शास्त्री चौक, लोणंद, ता. खंडाळा यांनी चोरी केले असल्याची फिर्याद लोणंद पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक सुळ करीत आहेत.


