ग्रामसेवकाचे कार्य आणि कर्तव्ये कोणती?
जाणून घ्या ग्रामीण भागाचा कणा असलेल्या ग्रामसेवकाबद्दल सविस्तर माहिती.
मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या साहस वार्ता च्या esahas.com या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. आजच्या या लेखात आपण गावातील ग्रामसेवक याबद्दलची माहिती घेणार आहोत. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.
काही दिवसांपूर्वी amazon Prime वर एक वेब सिरिज आली होती. पंचायत हे या वेब सिरिजचे नाव होते. या वेब सिरिज मध्ये गावातील लोक, गावातील वातावरण तर दाखवलेच आहे परंतु या वेब सिरिजचे मुख्य पात्र अभिषेक त्रिपाठी हे ग्रामपंचायत चे सचिव म्हणून दाखवण्यात आले आहे. हे ग्रामपंचायत सचिव म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नाही तर आपले ग्रामसेवक असतात. पंचायत ही वेब सिरिज आपण पाहिली असेल तर आपणास ग्रामसेवकांच्या कार्याची थोडीफार कल्पना नक्कीच आली असेल.
गावातील विकास करताना ग्रामसेवकाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव किंवा ग्राम विकास अधिकारी देखील म्हटले जात असते. गावाचा विस्तार, लोकसंख्या व उत्पन्न लक्षात घेता एका ग्रामपंचायतीसाठी एक किंवा अधिक ग्रामसेवकांची नियुक्ती ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे केली जात असते. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायतसमिती अधिनियम 1961, तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम-1958 प्रमाणे पंचायतीचे सचिव म्हणून ग्रामसेवक हे कार्य पार पाडत असतात. गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामसेवकाला खूप महत्त्वाची भूमिका व कर्तव्य पार पाडावे लागत असतात.
जसे की कलम 7 नुसार ग्रामपंचायतीच्या सहाय्याने सभा किंवा मासिक सभा बोलावणे, त्यासाठी योग्य त्या नोटिसा देणे, त्याचप्रमाणे त्या सभेमध्ये जे काही अघटित झाले ते लिहिणे आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने त्या सभेमध्ये जे काही निर्णय झाले ते सूचना फलकावर लावणे. असे अनेक कार्य हे ग्रामसेवकाला पार पाडावे लागत असतात.
ग्रामसेवकच्या कामाचे वर्गीकरण हे एकूण 9 भागांमध्ये केले जाऊ शकते. हे 9 भाग कोणते असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल? तर ग्रामसेवकाच्या कामाचे हे 9 भाग म्हणजे, ” प्रशासन, नियोजन, शेती विषयक योजना, कुटुंब कल्यान कार्यक्रम, कल्यानकारी योजना, गाव माहिती केंद्र, पशू संवर्धन योजना, संकीर्ण, आणि इतर योजना. ” हे सर्व कार्य पार पडण्याची जबाबदारी सरकारने ग्रामसेवकाला दिलेली असते.
जर ग्रामसेवकाने शिस्तभंग केली तर मात्र महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हासेवा नियम 1964 च्या नियम 4 नुसार ग्रामसेवकावर तशी शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. त्याचप्रमाणे ग्रामसेवकाच्या कार्यामध्ये जशिकीशासनाने किंवा जिल्हा परिषदेने बसवलेले कर किंवा प्लीज वसूल करणे ही कार्य देखील ग्रामसेवकाचे असते. गावातील रस्ते असतील किंवा सरकारी जमिनी असतील किंवा इमारती वगैरे असतील त्यांची नोंद ही ग्रामपंचायतीच्या रजिस्टरमध्ये व्यवस्थितपणे घेण्याचे कर्तव्य हे ग्रामसेवकाचे असते. तसेच जन्म मृत्यूविवाह यांच्या नोंदी देखील ठेवणे हे महत्त्वाचे कार्य ग्रामसेवक पार पाडत असतात. विशेष म्हणजे ग्रामपंचायत अधिनियम 129 प्रमाणे पाणीपट्टी किंवा विशेष पाणीपट्टी जो कर असतो तो आकारणे या सर्वांचा समावेश ग्रामसेवकाच्या कार्यामध्ये येत असतो.
बरेच वेळा होते असे की आपण आपले एखादे काम असते म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात जातो. तिथे आपल्या कामा बाबतीत कोणाला बोलायचे किंवा आपल्याला सविस्तर माहिती कोणाकडून मिळेल असा प्रश्न पडतो. तर अश्या वेळी निसंकोचपने आपण ग्रामसेवकला भेटून आपल्या शंकेचे निरसन केले पाहिजे. कारण जे काही शासकीय कामकाज असतात, ते सर्व ग्रामसेवकाच्या अख्त्यारीत येत असतात. शासनाचा कर्मचारी या नात्याने ग्रामसेवकाने आपले काम करून देण्याची जबाबदारी ही त्याच्यावर असते.
शासन बरेच वेळा शेतकर्यांसाठी किंवा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध योजना तय्यार करत असते. या योजना अमलात आलेल्या असतात. परंतु या सर्व योजनांची माहिती ही शेतकर्यांना किंवा सामान्य नागरिकांना असतेच असे नाही. तेंव्हा या योजना शेतकर्यांना किंवा ग्रामीण भागातील नागरिकांना समजावून सांगण्याची जबाबदारी ही ग्रामसेवकाची असते. आपणास एखाद्या अश्या योजनेबद्दल काही अपुरी माहिती कानावर पडली, आणि त्याबाबत आपणास अधिक माहिती हवी असेल तर आपण तत्काल ग्रामसेवकला भेटून याबाबत माहिती विचारून घेतली पाहिजे.
आता या लेखात आपण शासनाने नेमलेल्या ग्रामसेवकाची कर्तव्ये पाहिली. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी ग्रामसेवकला शासनाकडून पगार देखील मिळत असतो. परंतु बरेच वेळा असे पाहण्यात येते की आपली ही कर्तव्य पार पाडण्यासाठी देखील ग्रामसेवकाकडुन टाळाटाळ करण्यात येते. जसे की जन्माची नोंद घेण्यासाठी करण्यात येणारी टाळाटाळ, मृत्यू किंवा विवाह नोंदणी करण्यासाठी केली जाणारी टाळाटाळ हे आपल्यासाठी काही नवीन नाही. ही कर्तव्ये पार पाडण्यासाठी ग्रामसेवकाकडून बहुतांश वेळा पैशांची मागणी देखील केली जाते जे अयोग्य आहे. आणि आपण याबाबत आपले सरकार या वेबसाईट ऑनलाइन तक्रार देखील दाखल करू शकता.


