maharashtra

दोघांना मारहाण केल्याप्रकरणी नऊजणांवर गुन्हा


Nine persons have been booked for assaulting two persons
दोघांना मारहाण केल्याबद्दल नऊ जणांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : दोघांना मारहाण केल्याबद्दल नऊ जणांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२५ मार्च रोजी दोन वाजण्याच्या दरम्यान सातारा येथील पंताचा गोट येथे जावेद इब्राहीम शेख, तौफिक जावेद शेख, हिरालाल बाबूलाल शेख, नसीम जावेद शेख, वाहिदा अखिल शेख, सैफ जावेद शेख, जब्बार यासीन पठाण, लियाकत हिरालाल शेख, नसीम यासीन पठाण या नऊ जणांनी बिलीलाल अमिन शेख या महिलेच्या घरात अनाधिकार्‍याने प्रवेश करून शेख यांच्या पतीला जावेदने लाकडी दांडक्याने व जब्बारने ब्लेडने पायावर मारले. तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. तेथे असलेली शेख यांची मुलगी अरबीना हिला सुद्धा हाताने मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर बिलीलाल शेख यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वरील नऊ संशयितांविरोधात पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला.