खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बुध ग्राम पंचायतीच्या वतीने बुध स्टॅण्ड परिसर, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, स्मशानभूमी तसेच ईदगाह शाळा व परिसरात २५० झाडे लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
पुसेगाव : खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बुध ग्राम पंचायतीच्या वतीने बुध स्टॅण्ड परिसर, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, स्मशानभूमी तसेच ईदगाह शाळा व परिसरात २५० झाडे लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी सरपंच अभयसिंह राजेघाटगे, ग्रामपंचायत सदस्य गणेश सातपुते, विजय खराटे, ग्रामविकास अधिकारी शशिकांत माने, डॉ उमेश जगदाळे, विजय महामुलकर, महेश अनगळ, जयवंत जगदाळे, सागर जाधव, राहुल बोराटे, सुरेश राजेघाटगे, संतोष बोराटे, राहुल कदम, किरण खवळे, निवृत वनअधिकारी मोमीन, श्री नागनाथ विद्या मंदिरचे भगवान सरवदे व विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांनी सहभाग घेतला होता.
बुध ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी सामाजीक स्वच्छतेसोबत वृक्षारोपण करून सामाजीक बांधीलकी जपण्यात येत आहे, असे मत सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांनी व्यक्त केले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वृक्षांचे सगोपन अत्यंत नियोजनपूर्वक केले जात असून या चळवळीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये वड, पिंपळ, चिंच, गुलमोहर, जांभूळ, शो झाडे, फुलझाडे लावण्यात आली आहेत.


