maharashtra

शेअर बाजारात पैसे दुप्पट करून देतो म्हणुन तब्बल साडेसात लाखांची फसवणूक

एकास अटक; फलटण ग्रामीण पोलिसांची कामगिरी

Fraud of Rs 7.5 lakh as it doubles in the stock market
लोकांचा विश्वास संपादन करुन, शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करुन दुपटीने नफा मिळवून देतो, असे म्हणत लोकांकडून पैसे घेणाऱ्या भामट्यास फलटण ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सातारा : लोकांचा विश्वास संपादन करुन, शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करुन दुपटीने नफा मिळवून देतो, असे म्हणत लोकांकडून पैसे घेणाऱ्या भामट्यास फलटण ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
याप्रकरणी विक्रम जगन्नाथ भोसले, (रा. साखरवाडी) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी पांडुरंग दत्तात्रय चव्हाण, (वय 41, रा. साखरवाडी) याच्याविरोधात २३ जून रोजी  गुन्हा नोंदवला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी लगेच तपास सुरू केला असता आरोपीच्या खात्यामध्ये फिर्यदिने सात लाख सहासष्ट हजार पाचशे रुपये रक्कम पाठवल्याचे लक्षात आले. तसेच आरोपीने गावातील आणखी दोघांना आणि दोन ऊसतोडणी कामगारांनाही गंडा घातल्याचे निदर्शनास आले. त्यावरून आरोपीला भा. द. वि. कलम ४२०, ४१८, ४०६ या कलमांतर्गत रात्री साडे आठ च्या सुमारास अटक करण्यात आली आहे. परंतु आरोपीकडून अद्याप कोणत्याही प्रकारचा मुद्देमाल मिळाला नाही. याप्रकरणी अधिक तपास  पोलीस निरीक्षक गोडसे, पोलीस उपनिरीक्षक धोंगडे करत आहेत.