वाई, ता. वाई येथे अज्ञात चोरट्यांनी मोबाईल शॉपी फोडून सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : वाई, ता. वाई येथे अज्ञात चोरट्यांनी मोबाईल शॉपी फोडून सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १४ फेब्रुवारी रोजी १०.३० ते दि. १५ रोजी १० वाजण्याच्या सुमारास हरीहरेश्वर प्लाझा, ब्राह्मणशाही, वाई येथील श्री गणेश मोबाइल शॉपीच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ५० हजार रुपये किमतीचे आठ मोबाइल व मोबाइलचे साहित्य चोरून नेल्याची तक्रार निलेश बापूसाहेब जगताप, रा. वेळे, ता. वाई यांनी वाई पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.


