वडुज, ता. खटावजवळ दुचाकीला झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
सातारा : वडुज, ता. खटावजवळ दुचाकीला झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गौरव कैलास सानप, वय २९, रा. सातपवासी, ता. बीड हे दुचाकीवरुन जात असताना वडुज ते पुसेसावळी मार्गावर वडुज गावच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन त्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


