maharashtra

विवाहितेच्या छळप्रकरणी तिघांवर गुन्हा


Crime against three in marital harassment case
तू मला आवडत नाहीस, सीबीआर गाडी घेण्यासाठी माहेरहुन १० लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून विवाहितेला मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून तिचा छळ केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : तू मला आवडत नाहीस, सीबीआर गाडी घेण्यासाठी माहेरहुन १० लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून विवाहितेला मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून तिचा छळ केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ४ फेब्रुवारी २०२१ ते २ ऑगस्ट २०२१ अखेर रववितेज सेक्टर कोयनानगर प्राधिकरण, ता. पाटण तसेच पिंपरी-चिंचवड, जि. पुणे येथील राहत्या घरी कोमल रवींद्र चव्हाण वय २७ या विवाहित महिलेला पती रवींद्र दत्तात्रय चव्हाण याने तू मला आवडत नाही, तुझ्यात मला इंटरेस्ट नाही, मला सीबीआर गाडी घ्यायची आहे, त्यासाठी बाहेरून १० लाख रुपये घेऊन ये असे म्हणून तिला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. इंद्रायणी दत्तात्रय चव्हाण, दत्तात्रय पांडुरंग चव्हाण यांनी तुला नीट स्वयंपाक करता येत नाही, माहेरहून सोने घेऊन ये, असे म्हणून तिचा छळ केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.