१९ लाख २० हजार रुपयांचे कर्ज थकवून परस्पर ट्रकची विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हे
सातारा येथील अमोल ननावरे याचा समावेश
१९ लाख २० हजार रुपयांचे कर्ज थकवून परस्पर ट्रकची विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हे सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला असून अब्दुल कादिर सय्यद, रा. सुपा, ता. पुरंदर, जि. पुणे आणि अमोल ननावरे रा. सातारा अशी त्यांची नावे आहेत.
सातारा : १९ लाख २० हजार रुपयांचे कर्ज थकवून परस्पर ट्रकची विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हे सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला असून अब्दुल कादिर सय्यद, रा. सुपा, ता. पुरंदर, जि. पुणे आणि अमोल ननावरे रा. सातारा अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, २ कोटी ६५ लाख रुपये किमतीच्या २४ वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा सातारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने पर्दाफाश केल्यानंतर याच प्रकरणात आणखी एकाची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. दि. २३ फेब्रुवारी २०२१ रोजी सातारा येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या लकी प्लाझा, झेडपी चौक, येथील एका कार्यालयामध्ये अब्दुल कादिर सय्यद, आणि अमोल ननावरे या दोघांनी संगनमत करून अमोल आनंदराव शिंदे, रा. पोगरवाडी, ता. सातारा यांच्यासमवेत एम. एच. ११ सीएच ५२३७ आयशर ट्रक चालवण्यासाठी घेण्याबाबत व्यवहार करून तशी नोटरी केली होती. करारामध्ये ट्रकच्या थकलेल्या कर्जाची रक्कम १९ लाख २० हजार रुपये अब्दुल कादिर सय्यद व अमोल ननावरे हे भरण्यास बांधील होते. असे असतानाही वरील दोघांनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने १९ लाख २० हजार रुपयांचे कर्ज थकवून त्या ट्रकची परस्पर विक्री केल्याची तक्रार अमोल शिंदे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. वरील दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही.


