maharashtra

एमआयडीसीत घरफोडी


देगाव रस्त्यावरील एमआयडीसी येथील एका घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन सोने लंपास केले.

सातारा : देगाव रस्त्यावरील एमआयडीसी येथील एका घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन सोने लंपास केले.
ही घटना दि. १८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान झाली. याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. निशा नितीन खंडकर (वय २२, रा. बोरगाव, ता. कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. या घरफोडीत ११ हजार रुपये किंमतीचे सोने लंपास केले.