maharashtra

सातारा शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे

6 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

सातारा शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे मारून 6 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सातारा : सातारा शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे मारून 6 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तेली खड्डा, शनिवार पेठ, सातारा येथील पिंपळाच्या झाडाच्या आडोशाला समीर युनूस मुल्ला वय 50, राहणार शनिवार पेठ, सातारा आणि अस्लम खतीब शेख वर 48 राहणार रघुनाथपुरा, सातारा हे दोघे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 4 हजार 980 रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत गोडोली येथील पालवी हॉटेलच्या पाठीमागील परिसरात पत्र्याच्या शेडच्या आडोशाला रॉकी उर्फ अतुल बबन पार्टे रा. आष्टे, पोस्ट नागठाणे तालुका सातारा आणि समीर सलीम कच्छी राहणार मोळाचा ओढा, तालुका सातारा यांच्यासाठी जुगार घेणारे अरुण भगवान शिंदे हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 1 हजार 850 रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.