maharashtra

सोनगाव कचरा डेपो जवळ रॉकेट ट्रक पलटी

सुदैवाने जिवितहानी नाही; ट्रकचे मात्र नुकसान

Rocket truck overturns near Songaon waste depot
शेंद्रे ते सातारा बोगदा मार्गावर एक रॉकेट ट्रक ओढ्यात पलटी झाला. या अपघातात जिवितहानी झाली नसून ट्रकचे मात्र नुकसान झाले आहे.

सातारा : शेंद्रे ते सातारा बोगदा मार्गावर एक रॉकेट ट्रक ओढ्यात पलटी झाला. या अपघातात जिवितहानी झाली नसून ट्रकचे मात्र नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शेंद्रे ते सातारा बोगदा मार्गावर पवनचक्कीचे सामान एक रॉकेट ट्रक घेवून जात होता. हा रस्ता अरुंद असल्याने शिवशाही हॉटेल जवळ ट्रक चालकाचा रस्त्याचा अंदाज चुकला आणि ट्रक ओढ्यात पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसून ट्रकचे मात्र नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर ओढ्यातून ट्रक बाहेर काढण्यात आला आहे.