येथील सैनिक स्कूलमधील सात फूट चंदनाचे झाड अज्ञात तीन चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना रविवार, दि. 5 रोजी रात्री दीडच्या सुमारास घडली. याबाबत विरेश कुमार वय 45, रा. सैनिक स्कूल, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर तीन अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
सातारा : येथील सैनिक स्कूलमधील सात फूट चंदनाचे झाड अज्ञात तीन चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना रविवार, दि. 5 रोजी रात्री दीडच्या सुमारास घडली. याबाबत विरेश कुमार वय 45, रा. सैनिक स्कूल, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर तीन अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सैनिक स्कूलमधील हेलीपॅडजवळ 25 ते 30 वर्षांपूर्वींचे चंदनाचे झाड होते. हे झाड अज्ञात तीन चोरट्यांनी कापून चोरून नेले. या झाडाची किंमत सुमारे 18 हजार रुपये होती. पहाटेच्या सुमारास चोरटे सैनिक स्कूलमध्ये शिरले असल्याचे एका कर्मचार्याच्या लक्षात आले. मात्र, तोपर्यंत चोरट्यांनी चंदनाचे झाड चोरून पोबारा केला. याबाबतचा अधिक तपास हवालदार गायकवाड हे करीत आहेत.


