maharashtra

शिवसैनिकांच्या बंदोबस्तात एसटी बसेस सोडल्या

बस रोखून दाखविण्याचे आव्हान; सैनिकांनी शहरी बसेसला दिले संरक्षण

ST buses were released under the protection of Shiv Sainiks
सांगली शहरामध्ये शिवसेनेच्या पुढाकाराने सांगली- मिरज मार्गावर एसटी बसेस धावल्या. शहरी वाहतूकीच्या प्रवासी बस आगारातून बाहेर पडल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. बस रोखून दाखवा जशास तसे उत्तर देवू, असे  आव्हान पदाधिकाऱ्यांनी केले.

सांगली : सांगली शहरामध्ये शिवसेनेच्या पुढाकाराने सांगली- मिरज मार्गावर एसटी बसेस धावल्या. शहरी वाहतूकीच्या प्रवासी बस आगारातून बाहेर पडल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. बस रोखून दाखवा जशास तसे उत्तर देवू, असे  आव्हान पदाधिकाऱ्यांनी केले.
शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवसैनिकांच्या संरक्षणामध्ये सांगली ते मिरज या मार्गावर शहरी बसेस धावल्या. सांगली आगारात येवून एसटी बस रोखून दाखवाच शिवसेना स्टाईलने जशास तसे उत्तर देवू. असा इशार पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
शिवसेनाचे शहर प्रमुख महेंद्र चांडाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मोठ्या संख्येने सांगली आगारात जमा झाले होते. आगारप्रमुख यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर एसटी कामगार सेनेच्या पदाधिकार्‍यांनी चालक व वाहकांना पाचारण करण्यात आले. फलाटवर लागलेली खाजगी वाहतूक हटवून, गेल्या अनेक दिवसापासून डेपोत असणार्‍या शहरी बसेस अखेर फलाटावर लागल्या. सांगली ते मिरज या मार्गावर शिवसैनिकांच्या बंदोबस्तात बसेस सोडण्यात आल्या. त्यानंतर शिवसैनिकांनी मोठा जल्लोष करत जोरदार घोषणाबाजी केली.