maharashtra

‘‘समाजभूषण - दलितमित्र स्व.शिवराम माने यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोफत सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन’’


या प्रसंगी भव्य मोफत सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन संस्था कार्यक्षेत्रातील गरिब, गरजू रूग्णांच्यासाठी करण्यात आले आहे.

सातारा : महाराष्ट्र शासनाने, ‘‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार’’ प्रदान करून गौरविलेल्या व शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या ‘श्री जानाई मळाई सोशल ऍन्ड एज्युकेशनल फौंडेशन (जेमसेफ) सातारा’ संस्थेचे संस्थापक समाजभूषण-दलितमित्र स्व.शिवराम माने (गुरूजी) यांच्या 90 व्या जयंती सोहळ्यानिमित्त भव्य मोफत सर्वरोगनिदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या वतीने व ध्येयस्फुर्ती गट, कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र महाविद्यालय इंदोली, ता.कराड यांच्या विशेष सहकार्याने संस्था मुख्य कार्यालय माने कॉलनी, देगांवरोड, एम.आय.डी.सी.सातारा या ठिकाणी बुधवार दि.15 मार्च 2023 रोजी स.09:30 ते 02:00 वा. या वेळेत कोरेगांव-खटाव विधानसभा मतदारसंघाचे लोकनियुक्त आमदार. महेश शिंदे यांच्या हस्ते व समाजसेविका डॉ.सौ.अरूणाताई बर्गे, डॉ.सौ.प्रियाताई शिंदे, शिक्षण व अर्थ समिती जि.प.साताराचे माजी सभापती सुनिल काटकर, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे अध्यक्ष रविराज देसाई, जि.प.साताराचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे, माजी जि.प. सदस्य संदिपभाऊ शिंदे आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे.
या प्रसंगी भव्य मोफत सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन संस्था कार्यक्षेत्रातील गरिब, गरजू रूग्णांच्यासाठी करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये मधुमेह व मेंदुरोग तज्ञ डॉ.दत्तात्रय मोरे, किडनी विकार तज्ञ डॉ.सुनिल खोत, पोटविकार तज्ञ डॉ.प्रसाद भाटे, आस्थिरोग तज्ञ डॉ. राहूल पाटील, फिजिओथेरपिस्ट डॉ. विशाल माने, नेत्ररोग तज्ञ डॉ.विभावरी पाटील, कान-नाक-घसा तज्ञ डॉ.संकेत प्रभुणे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनिता लिपारे आदी तज्ञ व अनुभवी एम.डी.डॉक्टर्स सहभागी होणार आहेत.
या प्रसंगी मोफत ई.सी.जी. तपासणी, रक्तातील साखरेची मोफत तपासणी, बी.एम.आय. वजन, उंची तपासणी, ब्लडप्रेशर तपासणी, आहार तज्ञांकडून डाएट चार्ट व मोफत सल्ला, स्त्रीरोग तज्ञांकडून स्त्रियांच्या सर्व आजारांच्या तपासण्या, ह्दयरोगाबाबत सर्व रोगांचे निदान व सल्ला, नाक-कान-घसा आजारांच्या तपासण्या, मधुमेह, पोटदुखी, किडनी विकार, मेंदु रोगांच्या तपासण्या, अंगदुखी, चक्कर येणे आदी आजारांबाबत मोफत व नि:शुल्क मार्गदर्शन व सल्ला देण्यात येणार आहे.
या संपूर्ण मोफत भव्य सर्वरोगनिदान शिबिरामध्ये कोडोली, संभाजीनगर, समर्थनगर, विलासपूर, अहिल्यानगर, खिंडवाडी, कारंडवाडी, देगांव, निगडी, जैतापूर मधील गरजू रूग्णांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच सत्चर मार्गदर्शन मिळण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी 7083101988 व 9764000430 या नंबरवर नावनोंदणी करावी. शिबीरास येताना जुने रिपोर्ट व सध्या सुरू असणारी औषधे घेवून यावीत, असे आवाहन संस्थेच्या वतीने संस्थेच्या सांस्कृतिक विभागप्रमुख प्रतिभा जाधव यांनी केले आहे.