maharashtra

साताऱ्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मान्यवरांनी केले अभिवादन


The dignitaries greeted Mahamanav Dr. Babasaheb Ambedkar
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातारा पालिका शेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास खा. उदयनराजे भोसले यांनी तसेच सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध संघटनांच्यावतीने मान्यवरांनी अभिवादन केले.

सातारा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातारा पालिका शेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास खा. उदयनराजे भोसले यांनी तसेच सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध संघटनांच्यावतीने मान्यवरांनी अभिवादन केले.
आंबेडकर अनुयायांनी मेणबत्त्ती प्रज्वलीत करुन धम्म वंदना घेण्यात आली. यावेळी रिपाईचे अ गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, समता सैनिक दलाचे स्वयंसेवक, अमित वाघमारे आदी उपस्थित होते.
कोरोनाची रुग्ण संख्या कमी आल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध हटविण्यात आले असले तरी ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवा व्हेरियंटचे सावट घोंघावत असल्यामुळे राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यामुळे धार्मिक कार्यक्रमावर मर्यादा आल्याने जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार काहींनी घरातूनच महापरिनिर्वानदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.