सुमारे अठरा हजारांच्या सोयाबीनची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : सुमारे अठरा हजारांच्या सोयाबीनची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 26 जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हनुमंत अण्णा शिंदे राहणार गंगापूर तालुका सातारा यांनी त्यांची सोयाबीन असलेली 18 हजार रुपये किंमतीची बारा पोती गावातील गायत्री मंदिरात ठेवली होती. अज्ञात तिघांनी ईरटीका गाडी क्रमांक एमएच 12 केई 6949 घेऊन येऊन मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात ठेवलेली सोयाबीनची पोती लंपास केली आहेत. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक पिसाळ करीत आहेत.


