maharashtra

महिलेच्या पर्समधून तीस हजारांची चोरी


महिलेच्या पर्समधून अज्ञातांनी तीस हजारांची चोरी केल्याची फिर्याद वाई पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : महिलेच्या पर्समधून अज्ञातांनी तीस हजारांची चोरी केल्याची फिर्याद वाई पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास अनिता अंकुश कोंढाळकर रा. कोंढावळे, ता. वाई या वाई येथील आमंत्रण चौक येथे असणाऱ्या पद्मा मेडिकलमध्ये औषध खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. त्या औषध खरेदी करीत असताना अज्ञातांनी त्यांच्या पर्समधील 30 हजार रुपये चोरून नेले आहेत. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार पाटणकर करीत आहेत.