maharashtra

कोडोली येथून दुचाकीची चोरी


Bike theft from Kodoli
कोडोली तालुका सातारा येथील गुलमोहर मंगल कार्यालयाच्या परिसरात एमआययडिसी रोडवर अज्ञात चोरट्याने पंधरा हजार रुपये किमतीची बजाज डिस्कवर मोटर सायकल चोरून नेल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : कोडोली तालुका सातारा येथील गुलमोहर मंगल कार्यालयाच्या परिसरात एमआययडिसी रोडवर अज्ञात चोरट्याने पंधरा हजार रुपये किमतीची बजाज डिस्कवर मोटर सायकल चोरून नेल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
राहुल बाळू भोसले वय तीस राहणार गणेश चौक कोडोली यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक 16 रोजी दुपारी एक वाजता राहुल भोसले आपल्या काही कामानिमित्त गोडोली परिसरात गेले होते. त्यावेळी गाडी लावून ते एका ठिकाणी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. पोलीस हवालदार डीएस गुरव अधिक तपास करत आहेत.