maharashtra

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 18 जानेवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मंगेश अशोक साळुंखे रा. देगाव, ता. सातारा यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून सुयश सरडे रा. कोडोली, ता. सातारा आणि अभिराज जगताप रा. एमआयडीसी, सातारा यांनी लोखंडी रॉड आणि केबलच्या वायरने मारहाण केली. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पोलीस हवालदार दगडे अधिक तपास करीत आहेत.