भवानीबाई राजेमहाडिक समाधी जीर्णेाध्दारास सर्वतोपरी सहकार्य करणार
शाहुनगरी फाऊंडेशनच्या संस्थापिका श्री.छ. वृषालीराजे भोसले यांची ग्वाही
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांची नात व छत्रपती संभाजीराजे व येसूबाई राणीसाहेब यांच्या जेष्ठ कन्या भवानीबाई राजेमहाडिक यांच्या समाधी जीर्णेाध्दारास शाहुनगरी फाऊंडेशनच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही फाऊंडेशनच्या संस्थापिका वृषाली राजे भोसले यांनी दिली.
सातारा : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांची नात व छत्रपती संभाजीराजे व येसूबाई राणीसाहेब यांच्या जेष्ठ कन्या भवानीबाई राजेमहाडिक यांच्या समाधी जीर्णेाध्दारास शाहुनगरी फाऊंडेशनच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही फाऊंडेशनच्या संस्थापिका वृषाली राजे भोसले यांनी दिली.
तारळे (ता.पाटण) येथील भवानीबाई राजेमहाडिक यांच्या समाधीस सदिच्छा भेट दिल्यानंतर वृषाली राजे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, भवानीबाई यांचे लग्न हरजीराजे महाडिक व अंबिकाबाई यांचे पुत्र शंकराजी महाडिक यांच्याशी झाले भवानीबाई या अत्यंत हुशार व धाडशी होत्या. मोगलांच्या धामधुमीत तारळे गावाची झालेली वाताहात झाली . ते गाव 1 जुलै 1710 मध्ये भवानीबाईंनी परत उभी केले . शंकराजी महाडिक यांचे सुमारे 1728 च्या दरम्यान निधन झाले त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी भवानीबाई सती गेल्या. राजे महाडिक घराण्याच्या खासगी स्मशानभूमीत तारळे व काळगंगा नदीच्या संगमावर समाधी आहे. या समाधीस शाहुनगरी फाऊंडेशनच्या संस्थापिका श्री.छ.वृषालीराजे भोसले आणि पदाधिका-यांनी भेट दिली. या समाधीच्या जीर्णोध्दारासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी त्यांनी त्यांच्या पाऊलखुणा, दस्तऐवज, उपलब्ध असलेले पत्रव्यवहार, महाडिक यांच्या वंशजाचे वाडे यांना भेट देऊन समाधीच्या कामाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. यावेळी भानजी राजेमहाडिक, भाऊसाहेब राजेमहाडिक, कृष्णराजे राजेमहाडिक, शिवसिंग राजेमहाडिक, निलेश राजेमहाडिक, संदीप राजेमहाडिक, सौ. राजश्री राजेमहाडिक, स्नेहल राजेशिर्के, रेणुका राजेशिर्के, ज्योती राजेमहाडिक, सुशांत मोरे, निलेश झोरे, विक्रम क्षीरसागर, राजेमहाडिक परिवार उपस्थित होते.


