बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास नाका ते सिविल रस्त्यावर सौरभ राजू देवकुळे वय 22 राहणार प्रताप सिंह नगर सातारा हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एमएच 11 बीजी ०५२२ सार्वजनिक रस्त्यावर वेडेवाकडी, बेदरकारपणे, मानवी जीवितास धोका निर्माण होईल इतक्या बेदरकारपणे चालवीत असल्याचा आढळून आला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दीपक आनंदराव कांबळे यांनी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक अरुण पाटील करीत आहेत.


