येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या कुपर कॉलनी येथे दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात इसमाने वॉकिंग करीत असणाऱ्या एका डॉक्टर महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व चैन हिसकावून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या कुपर कॉलनी येथे दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात इसमाने वॉकिंग करीत असणाऱ्या एका डॉक्टर महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व चैन हिसकावून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २७ एप्रिल रोजी पावणेसात वाजण्याच्या सुमारास सातारा येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या कुपर कॉलनी येथे डॉक्टर मंजूषा शंतनु पवार, वय ४२, राहणार कूपर कॉलनी या वॉकिंग करीत असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची पावणेतीन तोळे वजनाचे लाल व काळया मण्याचे सोन्याचे मंगळसूत्र व १० हजार रुपये किमतीचे अर्धा तोळा वजनाची सोन्याची चैन असा एकूण साठ हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून चोरून नेले असल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


