शासकीय योजना यशोधन संस्थेपर्यंत पोहोचवू : पालकमंत्री शंभूराज देसाई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन
यशोधन संस्थेने वृद्ध व निराधार लोकांना चांगला आधार दिला असून हे रचनात्मक काम समाजासाठी दिशादर्शक आहे. ज्येष्ठ नागरिकांना लागू असणार्या योजनांचे लाभ यशोधन पर्यंत पोहचवू, असे प्रतिपादन उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
सातारा : यशोधन संस्थेने वृद्ध व निराधार लोकांना चांगला आधार दिला असून हे रचनात्मक काम समाजासाठी दिशादर्शक आहे. ज्येष्ठ नागरिकांना लागू असणार्या योजनांचे लाभ यशोधन पर्यंत पोहचवू, असे प्रतिपादन उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन समाजातील अनाथ, बेघर, वृध्द, निराधार लोकांसाठी काम करणार्या यशोधन ट्रस्ट या ठिकाणी आरोग्य सप्ताहानिमित्त ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अशोका कन्स्ट्रक्शन चे संजय मोरे आणि सातारा मेडिकल असोसिएशनचे प्रवीण पाटील यांच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते मेडिकल किट व आरोग्यदायी वस्तूंचे यावेळी वितरण करण्यात आले.
सातारा जिल्ह्यात यशोधन संस्था खूप चांगल्या पध्दतीने काम करत आहे. पण शासकीय योजना संस्थेपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. मात्र यापुढे शासकीय योजना संस्थेपर्यंत पोहचवण्याचा नक्की प्रयत्न करु, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. यशोधन च्या माध्यमातून अनाथांसाठी राबवित असलेल्या कामांची माहिती रवि बोडके व सोनल बोडके यांच्याकडुन पालकमंत्री यांनी घेतली.
संस्थेकडे येणारा रस्ता हा खराब व कच्चा असल्याचे पत्रकार यांनी सांगितले. त्यावर पालकमंत्री यांनी डीपीडीसी मधून तरतुद करुन 2 महिन्यात डांबरी रस्ता करणार असल्याचे सांगितले व जिल्हाधिकारी यांना तशा सुचना केल्या. यशोधन ट्रस्ट ला डीपीडीसी मधुन कायमस्वरुपी मदतीची तरतुद करुन संस्थेला कायमस्वरुपी कशी मदत करता येईल, यासाठी पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना पुढील आडवड्यात मिंटीग घेण्याचे सांगण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, मुख्यमंत्री यांचे बंधु- ठाणे चे नगर सेवक प्रकाश संभाजी शिंदे, महाबळेश्वर चे उपसभापती संजयबाबा मोरे, मेडिकल असोसिएशन सातारा चे अध्यक्ष प्रविण पाटील, जि.प.चे सदस्य शशिकांत पवार. बा.शिवसेना चे सातारा शहर अध्यक्ष निलेश मोरे, वाई चे तालुका अध्यक्ष दिनेश खैरे, हिदुस्थान प्रतिष्ठान चे जायगुडे, शिरवळ चे सामाजिक कार्यकर्ता साहिल काझी, मुराद पटेल, रोहन यादव, मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे रवि बोडके व सोनल बोडके यांनी स्वागत केले. मुराद पटेल यांनी सुत्रसंचलन केले.


