maharashtra

अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा


अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी ते मेढा रोडवरील आवाडवाडी येथे अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी महेश सुभाष गुरव (वय 30, रा. दिव्यनगरी, सातारा) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तालुका पोलिसांनी ही कारवाई दि. 3 रोजी केली असून याप्रकरणी पोलिस धोंडिराम हंकारे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.