बेदरकारपणे दुचाकी चालवणार्या दुचाकी स्वारावर उंब्रज पोलिसांनी कारवाई केली आहे.
उंब्रज : बेदरकारपणे दुचाकी चालवणार्या दुचाकी स्वारावर उंब्रज पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवडे, तालुका कराड गावच्या हद्दीत गणपती मंदिराजवळ पुणे-बंगलोर महामार्गावरील कराड बाजूकडे जाण्याच्या लेनवर मोहम्मद शबीर मोहम्मद जब्बार अंसारी राहणार ठाकूर ढाबा शिवडे तालुका कराड हा याच्या ताब्यातील एक्टिवा क्रमांक एम एच 11 बी 7699 ही दुचाकी वेगात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे चालवित असल्याचे निदर्शनास आल्याने याबाबतचा गुन्हा प्रमोद मारुती पाटील वय 35 यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात नोंदवला आहे. अधिक तपास पो.ना. शिंदे करीत आहेत.


