ठोसेघर सोसायटीची निवडणूक बिनविरोध
अध्यक्षपदी नामदेव अवकिरकर, उपाध्यक्षपदी दत्ताराम चाळके यांची वर्णी
ठोसेघर, ता. ठोसेघर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध होऊन अध्यक्षपदी नामदेव अवकिरकर, उपाध्यक्षपदी दत्ताराम चाळके यांची वर्णी लागली आहे.
सातारा : ठोसेघर, ता. ठोसेघर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध होऊन अध्यक्षपदी नामदेव अवकिरकर, उपाध्यक्षपदी दत्ताराम चाळके यांची वर्णी लागली आहे.
ठोसेघर येथील विकास सेवा सोसायटीची मुदत दोन वर्षांपूर्वीच संपुष्टात आली होती. मात्र कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. सहकारी संस्थांच्या निवडणुकांना हिरवा कंदील मिळाल्यानंतर सातारा पंचायत समितीचे माजी सदस्य शंकरआप्पा चव्हाण, विद्यमान उपसरपंच जयराम चव्हाण यांनी ठोसेघर सोसायटीची निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांसमोर ठेवल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला एक मताने मान्यता दिली. त्यामुळे नामदेव अवकिरकर, दत्ताराम चाळके, यशवंत चव्हाण, उत्तम काकडे, गणेश जाधव, दत्ताराम चव्हाण, विद्या देठे, अनुसया चव्हाण, अप्पाजी चव्हाण, गोपाळराव शिर्के, महादेव लोहार, शंकर बेडेकर हे १२ सदस्य बिनविरोध निवडून आले. यावेळी तांत्रिक कारणाने एक पद रिक्त राहिले आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची ही निवड बिनविरोध करण्याचा निर्णय झाल्यानंतर अध्यक्षपदी नामदेव अवकिरकर, उपाध्यक्षपदी दत्ताराम चाळके यांची वर्णी लागली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खोत आणि अनिल जाधव यांनी कामकाज पाहिले. नवनिर्वाचित अध्यक्ष- उपाध्यक्ष यांचे शंकर आप्पा चव्हाण, जयराम चव्हाण, कृष्णा चव्हाण, रामभाऊ चाळके, प्रदीप चाळके, प्रकाश चाळके, प्रवीण चव्हाण यांनी अभिनंदन केले.


