maharashtra

ज्वेलर्सच्या दुकानात चोरी


सातारा शहर परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : सातारा शहर परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवार पेठेतील विशाल पांडुरंग कटरे रा. मंगळवार पेठ, सातारा यांच्या श्री महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात दिनांक 26 जानेवारी रोजी दुपारी दोन ते सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अनोळखी चार महिला आल्या. त्यांनी खरेदीच्या बहाण्याने 22 हजार रुपये किंमतीचे, सहाशे ग्रॅम वजनाचे, सहा चांदीच्या पैंजणाचे जोड चोरून नेले आहेत. याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस हवालदार करपे करीत आहेत.