सातारा तालुक्यातील खिंडवाडी येथील सिव्हील कॉलनी परिसरात जावयाला मारहाण केल्याप्रकरणी सासूसह तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यशोदा घाडगे, जीवन घाडगे, सुप्रिया घाडगे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.
सातारा : सातारा तालुक्यातील खिंडवाडी येथील सिव्हील कॉलनी परिसरात जावयाला मारहाण केल्याप्रकरणी सासूसह तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यशोदा घाडगे, जीवन घाडगे, सुप्रिया घाडगे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील नागठाणे येथील इंद्रजित नारायण ताटे (वय ३९) हे रविवार, दि. ९ रोजी साताऱ्यातील खिंडवाडी येथील सिव्हिल कॉलनीत असणाऱ्या सासुरवाडीत आले होते. येथे काही कारणातून त्यांचा वाद झाला. यावेळी सासू यशोदा रामदास घाडगे हिने इंद्रजित यांच्या कानाखाली मारली तर मेहुणा जीवन रामदास घाडगे याने हातातील सुरीने डाव्या हाताच्या करंगळीस तसेच मानेवर उजव्या, डाव्या बाजूला ओरखडले तर पत्नी सुप्रिया ताटे हिने गळ्याच्या उजव्या बाजूला हाताने बुक्की मारली. यानंतर या तिघांनीही इंद्रजित यांना शिवीगाळ करत दमदाटी केली.
याबाबतची तक्रार इंद्रजित ताटे यांनी दि. ९ रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सासू यशोदा रामदास घाडगे, मेहुणा जीवन रामदास घाडगे (दोघे रा. कामेरी, ता. सातारा) आणि सुप्रिया इंद्रजित ताटे (रा. फ्लॅट नंबर २, सिव्हील कॉलनी ड्रीम प्राईड अपार्टमेंट, संभाजीनगर, खिंडवाडी, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास महिला पोलीस नाईक शिंदे करत आहेत.


