maharashtra

महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा


महिलेची फसवणूक करून तिची बोरमाळ लंपास केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : महिलेची फसवणूक करून तिची बोरमाळ लंपास केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान सुनंदा उद्धव इंदलकर वय 70 राहणार प्रतापगंज पेठ सातारा या वृद्ध महिलेस अंदाजे 30 ते 35 वर्षाच्या दोन अज्ञातांनी समोर एक मारवाडी दुकानदार आहे. त्याला दहा वर्षांनी मुलगा झाला आहे. त्या बाळाला आशीर्वाद दिला तर ते शेठ साडी वगैरे दान देतात, असे खोटे सांगून इंदलकर यांच्या गळ्यातील चाळीस हजार रुपयाची बोरमाळ पर्समध्ये ठेवा म्हणजे तुम्ही गरीब दिसाल आणि ते शेठ तुम्हाला साडी दान देतील, असे सांगून ती बोरमाळ हातात घेऊन ती पर्समध्ये न ठेवता हातचलाखीने लंपास केली आहे. याबाबत या दोन भामट्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस हवालदार तावरे करीत आहेत.