maharashtra

एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा


एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, टेंम्पोचा धक्का लागला, या गैरसमजातून चौघांनी एकाला मारहाण केली. याबाबत प्रवीण प्रल्हाद घोरपडे (वय 35, रा. ज्योतीबाची वाडी ता.सातारा) यांनी संदेश चोरगे, शंकर चोरगे, जोतिराम चोरगे, रोहित मोरे (सर्व रा.चोरगेवाडी ता.सातारा) यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 13 नोव्हेबर रोजी घडली आहे. संशयितांनी शिवीगाळ, दमदाटी करत दगडाने मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.