maharashtra

महामार्गावर चेन स्नॅचिंग


पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चेन स्नॅचिंग झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चेन स्नॅचिंग झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास म्हसवे डी मार्ट ते सातारा जाणाऱ्या सर्विस रोड लगत राजश्री सुरेश जगदाळे राहणार म्हसवे, तालुका सातारा या महिलेच्या गळ्यातील तीस हजार रुपये किंमतीचे एक तोळा वजनाचे मंगळसूत्र पाठीमागून मोटरसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून जबरदस्तीने चोरून नेले आहे. याबाबतची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार परिहार करीत आहेत.