शाहूपुरी पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : शाहूपुरी पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास प्रकाश नथुराम देवरुखे रा. सांबरवाडी, पोस्ट यवतेश्वर, ता. सातारा हा समर्थ मंदिर चौक येथील समर्थ मंदिराच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशास जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून 560 रुपये व दुकानाचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.


