maharashtra

दमदाटी करून काम बंद पाडल्याने तिघांवर गुन्हा दाखल


A case has been registered against three persons for forcibly stopping work
शौचालयाची तोडफोड करून नुकसान केले आहे. या नुकसानी विरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार ढमाळ करत आहेत.

सातारा : शाहूपुरी येथील जिल्हा परिषद कॉलनीतील फिर्यादी राजन रामचंद्र चव्हाण (वय 63 रा. प्रतापगंजपेठ) यांच्या जागेत काम सूरू होते. यावेळी संशयित संदीप शांताराम चव्हाण, रणजित शांताराम चव्हाण, चेतन शांताराम चव्हाण (तिघे रा. शाहूपुरी) यानी कुराड व कुदळ घेवून जागेत सूरू असलेल्या कामाच्या ठिकाणी आले. आणि कामगारांना दम देवून काम बंद पाडले. 
तसेच शौचालयाची तोडफोड करून नुकसान केले आहे. या नुकसानी विरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार ढमाळ करत आहेत.